सहारनपूर : भारतीय किसान संघाचे ऊस विभाग संयोजक श्यामवीर त्यागी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी उसाची थकीत रक्कम त्वरीत देण्याची मागणी करण्यात आली.
श्यामवीर त्यागी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी ऊस भवानात पोहोचले. तेथे त्यांनी जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन त्रिपाठी यांची भेट घेतली. नागल येथील बजाज शुगर मिल गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे शोषण करीत आहे. कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे शेतकऱ्यांना गळीत हंगाम २०२०-२१ या एकाच वर्षाचे उसाचे पैसे मिळाले आहेत. जिल्हाध्यक्ष राहुल कौशिक म्हणाले, बजाज शुगर मिलने जाणिवपूर्वक सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. कारखान्याविरोधात अहवाल सरकारकडे पाठवला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी विभाग अध्यक्ष हरवीर सिंह, विक्रम सिंह पुंडीर, मुनेश त्यागी, संदीप कौशिक, राजेश कुमार, संजय सिंह, बिजेंद्र कुमार आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link