ऊस दर प्रती क्विंटल ४०० रुपये जाहीर करण्याची मागणी

हापूड : भारतीय किसान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत ऊसाचा दर ४०० रुपये प्रती क्विंटल जाहीर करण्याची मागणी केली. याशिवाय शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपये थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

सकाळी अकरा वाजता भारतीय किसान संघाचे हापुडमधील कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. महागाई सातत्याने वाढत आहे. मात्र, सरकार ऊसाचा दर वाढवत नसल्याचा आरोप संघाचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित सोळंकी यांनी केला.

डिझेल दर वाढल्याने ट्रॅक्टर चालवणे अवघड झाले आहे. याशिवाय खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या आहेत. शेतकऱ्यांकडे पैसे उपलब्ध नाहीत. मात्र, सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत. अशा कारखान्यांवर कारवाई करावी. कारखान्यांनी पैसे दिले नाहीत तर कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत असा इशारा देण्यात आला. याप्रश्नी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. याशिवाय उसाचा दर ४०० रुपये प्रती क्विंटल करावा अशी मागणी करण्यात आली. याबाबत किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here