मुजफ्फरनगर: ऊसाच्या प्रलंबित थकबाकी च्या मागणीसाठी कोतवालीमध्ये भाकियू कार्यकर्त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवले आहे. खतौली च्या तहसीलचे अध्यक्ष म्हणाले की, जोपर्यंत शेतकर्यांची ऊस थकबाकीची समस्या सुटत नाही तोपर्यंत त्यांचे धरणे आंदोलन सुरुच राहिल.
व्याजासहित उसाची थकबाकी भागवण्याच्या मागणीवरुन कोतवाली परिसरामध्ये भाकियू कार्यक़र्त्यांचे आंदोंलन आज चौथ्या दिवशीही सुरु राहिले. आंदोलनस्थळी बुधवारी सानजठ तहसील चे पदाधिकारी उपस्थित होते. खतौलीच्या तहसीलचे अध्यक्ष अशोक घटायन यांनी सांगितले की, भाजपाच्या सरकारमध्ये शेतकर्यांना आपल्या पैशांसाठी ही धरणे आंदोलन करावे लागत आहे. भाजपच्या सरकारमध्ये शेतकर्यांना सर्वात जास्त त्रास होत आहे. वेळेवर शेतकरी बँक कर्ज किंवा विजेचे बिलही देवू शकत नाही, तेव्हा त्यावर व्याज आणि पेनाल्टी लागू केली जाते. शेतकर्यांच्या थकबाकीवरील व्याज मिळणे तर दूरच, नियमितपणे त्यांची थकबाकीही भागवली जात नाही. माजी प्रधान विकास त्यागी यांनी सांगितले की, सत्तेत असणारे कोणतेही सरकार असेच आहे. शेतर्यांचे त्यांनी कायम शोषणच केले आहे. त्यांनी सांगितले की,शेतकर्याचे सर्वात जास्त शोषण भाजप सरकारने केले आहे. आंदोलनस्थळी संजीव पवार यांनी सांगितले की, शेतकर्यांना व्याजासहित थकबाकी दिली जावी.बुढाना चे तहसील अध्यक्ष अनुज बालियान यांनी सांगितले की, भाजपा च्या सरकारमध्ये देशामध्ये अन्नधान्य खायला घालणारा शेतकरी बिचारा झाला आहे. व्यापाऱ्या पासून अगदी सरकारही शेतकर्यांचे शोंषण करतात. शेतकर्यांना पीकाचे योग्य पैसे मिळत नाहीत. आजच्या आंदोलनामध्ये महकार, सहसरपाल, राजेंद्र, नदीम, सुभाष, राजू, किशन त्यागी आदींनी मनोगत व्यक्त केले. अनुज बालियान यांनी सांगितले की, गुरुवारी मोरना ब्लॉक चे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.