लॉकडाउन च्या नियमांत शिथिलता दिल्याने देशात साखरेची मागणी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : चीनी मंडी

लॉक डाउन च्या नियमांमध्ये शिथिलता दिल्याने साखरेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. आता जेव्हा लॉकडाउन शिथील झाला आहे, आणि हॉटेल्स आणि मॉल देखील खुले करण्याची परवानगी दिली जात आहे, मे 2020 च्या तुलनेत जूनमध्ये साखरेच्या मागणीत अधिक वाढ होईल.

इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (ISMA)च्या अनुसार, साखर कारखाने मे बरोबरच जून चा विक्री कोटा विकण्यात सक्षम होऊ शकतात. उत्तर भारतातील साखर कारखान्यांनी मे साठी दिल्या गेल्या आपल्या मासिक कोटयानुसार साखर विकली, पण पश्चिम आणि दक्षिण भारतातील साखर कारखाने साखर विक्रीत अपयशी राहिले. त्यामुळे सरकारने मे च्या विक्री कोटयाची मुदत वाढवली आहे आणि जून
2020 साठी 18.5 लाख टन मासिक कोटा जारी केला आहे.

ISMA च्या अनुसार, देश भरातील साखर कारखान्यांनी 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मे 2020 दरम्यान 268.21 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. हे गेल्या वर्षीच्या 31 मे 2019 पर्यंत उत्पादित 327.53 लाख टन पेक्षा 59.32 लाख टन इतके कमी आहे. 31 मे 2019 ला ऊस गाळप करणाऱ्या 10 साखर कारखान्यांच्या तुलनेत, या वर्षी 31 मे 2020 ला 18 साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत.

ISMA ने चालू हंगामासाठी 265 लाख टन उत्पादनाचा अंदाज केला होता. पण गुळ निर्मात्यांनी लॉकडाउन मुळे फारच पूर्वी उत्तर प्रदेश मध्ये आपले उत्पादन बंद केले होते. यामुळे मोठया प्रमाणात ऊस कारखान्यांना मिळाला होता. यामुळे उत्तर प्रदेश मध्ये कारखान्यांकडून अतिरिक्त ऊसाचे गाळप झाले आहे आणि चालू हंगामात मुख्यत्वे यूपी मधून अतिरिक्त 5 ते 6 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. यासाठी चालू वर्षात साखर उत्पादन जवळपास 270 लाख टन होण्याची आशा आहे. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 60 लाख टन कमी आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here