बिजनौर : आझाद किसान युनीयनच्या मासिक बैठकीत ऊसाचा दर ४५० रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीत केंद्र सरकारने कृषी विधेयक मागे घ्यावे असा ठरावही करण्यात आला.
ऊस समितीच्या परिसरात झालेल्या बैठकीत युनीयनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विरेंद्र सिंह म्हणाले, सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकामुळे सरकारचेच खूप नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींवर धनदांडग्यांचा कब्जा होईल. त्यामुळे सरकारने हे कायदे त्वरीत मागे घेतले पाहिजेत. प्रदेश संयोजक एम. पी. सिंह म्हणाले, चार महिन्यानंतर ऊसाचा दर सरकारने जाहीर केलेला नाही. ऊसाचा किमान दर ४५० रुपये करण्याची गरज आहे.
जिल्हाध्यक्ष धीरज कुमार यांनी शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याचे सांगीतले. जिल्हा महासचिव सतेंद्र राठी म्हणाले, ज्या शेतकऱ्यांची वयाची साठ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना निवृत्ती वेतनाची सुविधा करण्याची गरज आहे. प्रदेश संगठन मंत्री संजीव राठी यांनी निराधान प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीला आळा घालण्याची मागणी केली. राहुल पंडित यांनी विजेचे वाढलेले दर कमी करावेत असे सांगितले. यावेळी पवन कुमार, राहुल कुमार, राम सिंह पहलवान, हरवीर सिंह, सुभाष काकरान, शीशराम सिंह, महेंद्र सिंह, सुरेंद्र सिंह, ऋषिपाल सिंह, अमर सिंह आदी उपस्थित होते.