सहारनपूर : शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी उत्तर प्रदेश मुक्ती मोर्चाच्या सदस्यांनी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगतसिंह वर्मा यांच्या नेतृ्त्वाखाली शहरातून बाईक रॅली काढली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत उप जिल्हाधिकारी एस. एन. शर्मा यांना निवेदन दिले. आगामी गळीत हंगामात ऊसाचा दर प्रती क्विंटल ६०० रुपये करण्याची मागणी करण्यात आली.
प्रदेश मुक्ती मोर्चाच्या सदस्यांनी पेपर मील रोडवरुन विश्वकर्मा चौक, चौधरी चरणसिंह चौक, घंटाघर, कोर्ट रोडवरून बाईक रॅली काढली. मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगतसिंह वर्मा म्हणाले, भाजपचे राज्यातील सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. केद्र सरकारने तिन्ही कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करुन एसएमपीबाबत हमी कायदा करावा. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा हमीभाव मिळावा यासाठी स्वामीनाथन आयोगाचा अहवाल त्वरीत लागू करावा.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचा आरोप वर्मा यांनी केला. सरकारने सर्व प्रकारची कर्जे माफ करावीत यांसह महामार्गावरील टोल बंद करावेत, मनरेगा योजना शेतीशी जोडावी अशा मागण्या निवेदनात केल्या. यावेळी वीरेंद्र चौधरी, रविंद्र चौधरी गुर्जर, आसिम मलिक, सुशील चौधरी गुर्जर, सरदार गुरविंदर सिंह बंटी, वीरेंद्र सिंह बिल्लू, सुनील धीमान, मोहम्मद वसीम जहीरपूर, सुरेंद्र सिंह, महबूब हसन आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link