मेरठ : भारतीय शेतकरी कामगार संघाच्या कार्यकर्त्यांनी ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले दिवी जावीत अशी मागणी करण्यात आल्याचे संघाचे महामंत्री राजकुमार यांनी सांगितले.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ऊस खरेदी केंद्रावर वजनात हेराफेरी केली जात आहे. असे प्रकार थांबवावेत असेही संघाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कार्यकर्त्यांनी सांगितले की, ऊस खरेदी केंद्रावर ऊस वजन करणारे लिपिक शेतकऱ्यांकडून २ टक्के पैसे घेत आहेत. किनौनी साखर कारखान्याकडून खरेदी केंद्र हटवून ते दौराला अथवा सकौती साखर कारखान्याकडे द्यावे अशीही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. किनौनी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी ऊस बिले वेळेवर मिळतील याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. गेल्या हंगामात किनौनी साखर कारखाना वगळता सर्व कारखान्यांनी पैसे दिले आहेत. किनौनी साखर कारखान्याला नोटीस जारी करण्यात आली आहे असे ऊस अधिकारी म्हणाले. वजनातील हेराफेरीचे प्रकार रोखण्यासाठी विभागाची पथके पाहणी करीत आहेत. गैरप्रकार आढळल्यास केंद्र बंद केले जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी राजकुमार, ब्रजपाल सिंह, आशीष, हरेंद्र सिंह आदी उपस्थित होते.