अहिल्यानगरमधील उसाला परराज्यातून मागणी

अहिल्यानगर : जिल्ह्यातील ऊसाला रसवंतीसाठी परराज्यातून मागणी वाढू लागली आहे.दिवसभरात जवळपास दीडशे टन ऊस रसवंतीला लागतो.महाराष्ट्रासह हरयाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश येथील रसवंतीसाठी नेवासा तालुक्यातील उसाला पसंती मिळत आहे. उसाला प्रती टन ३५०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्यांऐवजी रसवंतीला ऊस देणे परवडत आहे. राज्यातही विविध ठिकाणी नेवासा तालुक्यातील उसाला वाड्यासह रसवंती, जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी असते.

सध्या तालुक्यातून दररोज १०० ते १५० टन ऊस रसवंतीसाठी एजंटमार्फत पाठविला जातो. येत्या हंगामात उसाची टंचाई निर्माण होऊन भाव वाढण्याची शक्यता आहे.सध्या एका ट्रकमध्ये २० टन ऊस नेला जातो. त्याचे भाडे ३५ ते ४५ हजार रुपये होते.राजस्थान, दिल्ली, पंजाब या राज्यांसाठी २० टन उसाचे ट्रक असतात.तोडणी कामगारांना ५०० रुपये प्रती टन पैसे व चाऱ्यासाठी वाढे मिळते. राज्यातील उसाला २५०० ते २८०० प्रती टन दर मिळतो.परराज्यात जाणाऱ्या उसाला ३५०० रुपये टन दर मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here