भारतीय किसान युनियन (वर्मा) आणि पश्चिम मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी उप जिल्हाधिकारी मानवेंद्र सिंह यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या उसाचा हमीभाव 600 रुपये जाहीर होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे अध्यक्ष भगतसिंग वर्मा यांनी सांगितले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भाकियूच्या आणि पश्चिम मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी आणि कामगार देवबंद बुर्जघर येथून नागल, पेपर मिल रोड, घंटाघर चौक आदीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचले. तेथे उसाच्या दरवाढीची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रगतीनेच देशाची प्रगती होऊ शकते, असे भगतसिंह वर्मा म्हणाले. भाजपच्या नऊ वर्षांच्या सत्तेत शेतकरी देशोधडीला लागला आहे. राज्याचे चार भाग करून वेगळे पश्चिम राज्य निर्माण करावे, अशी मागणीही त्यांनी केली. भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ते अशोक मलिक आणि रवींद्र चौधरी यांनी देशातून टोल रद्द करावा, अशी मागणी केली. उसाच्या थकीत बिलांची वसुली करण्यासह शेतकऱ्यांना मोफत विज पुवठ्याची मागणी करण्यात आली. यावेळी नीरज कपिल, राजा सोनू, मुनेश पाल, नैन सिंग, वीरपाल सिंग, सुभाष त्यागी आदी उपस्थित होते.