पणजी : संजीवनी साखर कारखाना गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या दूरदृष्टीची योजना होती. त्यांनी या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहीत केले असे प्रतिपादन विरोधी पक्षानेते युरी आलेमाव यांनी केले.
ते म्हणाले की, गोव्याचा हा वारसा वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. राज्य सरकार ताबा माफियांच्या हाती देऊ इच्छीत आहे. तसे होऊ देणार नाही. शुक्रवारी गोमंतक शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी युरी यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात संजीवनी साखर कारखान्याचा मुद्दे उपस्थित करण्याची मागणी केली. यावेळी युरी म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इथेनॉल युनिट लागू करण्याबाबत विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्वरीत थकीत पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे.