पणजी : तृणमूल काँग्रेस (TMC) ने सोमवारी ऊस खरेदी प्रक्रियेदरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. TMC च्या महासचिव राखी प्रभूदेसाई यांनी ऊस उत्पादक शेतकरी सुविधा समितीचे प्रमुख नरेंद्र सवाईकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काणकोण, नेत्रावळी आणि शेल्डे येथील ऊस उत्पादकांसह प्रभुदेसाई यांनी संजीवनी कारखान्याबाबत प्रश्न विचारले आहेत. सावईकर यांनी संजीवनी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवन योजना आणि कारखान्याच्या जागेवर इथेनॉल प्लांट स्थापन करण्याच्या प्रयत्नांबाबतचा आपला रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली.
त्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्यांना आता तिसऱ्या वर्षानंतर भरपाई बंद केली जाईल असे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ऊस उत्पादनानंतर नुकसान भरपाई देण्याचा दावा करण्यात आला होता असा दावा प्रभुदेसाई यांनी केला. आता त्यांना भरपाई मिळणार नाही. प्रभुदेसाई यांनी सांगितले की, एक ठेकेदार ऊस तोडणी करत आहेत. आणि हा ऊस गाळपासाठी आजरा कारखाना (महाराष्ट्र) नेण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांना त्याचा हिशोब दिला जात नाही.