ओडिसामध्ये ऊस शेतीला प्रोत्साहन देण्याची मागणी

केंद्रपाडा : ओडिसाच्या केंद्रपाडा जिल्ह्यात पूर्वापार १५,००० हेक्टर ऊस शेती केली जात होती. मात्र, आता ती घटून १००० हेक्टरपेक्षाही कमी झाली आहे. अशाच पद्धतीने एक संशोधन केंद्राने ज्यूट शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते आता ओस पडले आहे. पाणी व्यवस्थापन धोरणाच्या अभावामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. बाजारपेठ, साखर कारखान्याची कमतरता आणि सिंचनासाठी नदीशी जोडण्यात आलेले अपयश हे यामागील कारण आहे. परिणामी तूर, सुर्यफूल यांसारखी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची शेती संकटात सापडली आहे.

गरदपूर, मार्श घई, देराबिश, पत्तामुंडाई, औल आणि राज कनिका ब्लॉक येथील शेतकरी १५००० हेक्टरपेक्षा अधिक ऊस शेती करीत होते. दहा वर्षापूर्वी पूर्व कृष्णदासपूरमध्ये साखर कारखाना सुरू होता. मात्र, कारखाना बंद पडल्याने आणि पाणी तसेच वितरणातील सुविधांमुळे ऊस शेतीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना उपजिविकेसाठी पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, राज्य सरकारने ऊस शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. राज्याला २.२१ लाख मेट्रिक टन साखरेची गरज भासते. मात्र, जिल्ह्यातील ऊस शेतीत घसरण होत असल्याने बहुसंख्य ठिकाणचे साखर कारखाने बंद आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here