शामली : ऊस शेतकऱ्यांची थकबाकी भागवणे आणि ऊसाचे मूल्य वाढवण्याचे राजकारण सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी निवडणूकीत केलेल्या घोषणा पूर्ण केल्या नाहीत, तसेच वीजेचे वाढलेले दरही मागे घेतलेले नाहीत, या प्रश्नाला घेऊन समाजवादी पार्टीच्या (सपा) कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हाकेवर शामली जिल्ह्यातील ऊन, कैराना आणि शामली तहसील मध्ये सपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
आंदोलनात सहभागी शेकडो सपा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले. कार्यकर्त्यांनी यावेळी सरकार विरोधात घोषणाही दिल्या. राज्य योजना आयोगाचे पूर्वीचे सदस्य प्रा. सुधीर पवार यांनी मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, योगी सरकारचा अर्धा कार्यकाल पूर्ण झाला आहे, आताापर्यंतच्या त्यांच्या घोषणा अपयशी ठरल्या आहेत. विकास कामेही झालेली नाहीत. ते केवळ निवडणुक जिंंकण्यासाठी हिंदूूू -मुस्लीम वैमनस्य वाढवण्याचे राजकारण करतात. पूर्व विधायक किरण पाल कश्यप यांनी देखील योगी सरकारला बहुजन विरोधी म्हटले आहे. सपा जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी ऊस थकबाकी, ऊसाचे मूल्य वाढवणे तसेच वीजेच्या वाढलेल्या दरांना मागे घेण्याची मागणी केली आहे.
या आंदोलनात डायरेक्टर ओम सिंह नाला, उदयवीर सिंह पूर्व चैयरमेन एलम, विजय कौशिक, प्रदीप चौधरी, सिभालका, रवि बालियान, अहसान, जावेद जंग, अनुज जावला, मांगेराम मलिक, सत्यपाल कश्यप, कैराना, राव तफर्रूज, मौ. माजिद मलिक, मकबूल मलिक, राहुल शर्मा, राहुल राणा, संजय उपाध्याय आणि रविद्र जोगी यांनी सहभाग घेतला.