शामली: ऊस थकबाकी, केसीसी, शेतकरी सन्मान निधी यांसह शेतकर्यांच्या अनेक समस्यांबाबत रालोद छात्र सभेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून एसडीएम संदीप कुमार यांना निवेदन दिले. कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, शेतकर्यांची थकबाकी लवकर भागवली नाही तर नाइलाजाने त्यांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल. ज्याची जबाबदारी पूर्णत: शासन आणि प्रशासनाची राहील.
सोमवारी राष्ट्रीय लोकदर छात्र सभेच्या तत्वावधान मध्ये कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून आंदोलन केले. रालोद कार्यकर्त्यानी सांगितले की, शेतकर्यांची थकबाकी लवकर भागवली जात नाही. ज्यामुळे त्यांच्या समोर आर्थिक संकट उभे आहे. शेतकर्यांची केसीसीची मर्यादा दुप्पट झाली पाहिजे आणि त्यावर 1 टक्का व्याज देखील असले पहिजे. त्यांनी मागणी केली की, शेतकर्यांना विजेचे बिल माफ करावे. लॉकडाउन च्या वेळच्या प्रत्येक प्रकारची रिकवरी पूर्णपणे थांवबली गेली पाहिजे. याबराबेरच शेतकर्यांना मिळणार्या शेतकरी सन्मान निधीची रक्कम सहा हजाराहून वाढून वार्षिक तीस हजार रुपये करावी. आणि याची अंमलबजावणी लगेचच करावी. प्रवासी मजूर, रिक्षा चालक, छोटे दुकानदार यांनादेखील 10 हजार रुपयांचा सहायता निधी देण्यात यावा. याबरोबरच शाळांची तीन महिन्यांची फी माफ करण्यात यावी यावरदेखील जोर देण्यात आला. रालोद ने राज्यपालांच्या नावाचे निवेदन एसडीएम संदीप कुमार यांच्याकडे दिले. निवेदन देनार्यांमध्ये राजन जावला डॉ. मुबारक अली यांच्यसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.