तिरुची : केंद्र सरकार भात आणि उसाच्या दराची हमी देण्याच्या आश्वासनापासून मागे हटल्याचा आरोप करत देसिया थेनिंधिया नादिगल इनप्पू विवसायगल संगमच्या सदस्यांनी तिरुची येथे निदर्शने केली. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या असोसिएशनचे अध्यक्ष पी. अय्यकन्नू यांनी सांगितले की, केंद्र सरकार भात आणि उसाला लाभदायी दर मिळवून देण्याचे आपले आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांचे उल्लंघन करताना छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरीत (डीबीटी) करण्यात आलेली पेन्शन आणि इतर कल्याणकारी योजनांची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात समायोजित करण्यास सुरूवात केली आहे. हे गैर आहे.
ते म्हणाले की, काही बँक शाखांच्या व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामधून पैसे काढण्यास परवानगी दिलेली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी ऑल इंडिया रेडिओसमोरील भारतीदासन रस्त्यावर एक मानवी साखळी तयार केली आणि सार्वजनिक क्षेत्रातील एक बँकेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ८० पुरुष आणि आठ महिलांना तेथून हटवत ताब्यात घेतले.