बिले देण्यास उशीर झाल्याने संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांची निदर्शने

कर्नाल : बिले देण्यास उशीर झाल्याच्या विरोधात शेकडो शेतकऱ्यांनी मंगळवारी कर्नाल सहकारी साखर कारखान्यात धरणे आंदोलन केले. पावसामुळे आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मध्ये रोखले. मात्र, साखर कारखान्याच्या विश्रामगृहात सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पूजा भारती यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन समाप्त केले.

हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पूजा भारती यांनी आश्वासन दिले की, उर्वरीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर ऊस बिले दिली जातील.

भादसों येथील पिकाडिली साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना बिले देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या एका गटाने इंद्री उपजिल्हा कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांनी आपल्या मागण्यांचे उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. बिकेयूचे जिल्हाध्यक्ष सुरिंदर सिंह यांनी सांगितले की, कायद्यानुसार, साखर कारखान्यांनी १४ दिवसात शेतकऱ्यांना बिले देणे बंधनकारक आहे. मात्र, कारखाना वेळेवर बिले देण्यात अपयशी ठरला आहे. आणि शेतकऱ्यांना आपली थकबाकी मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here