सहारनपूर : नव्या गळीत हंगामात देवबंद येथील त्रिवेणी साखर कारखाना शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यात अव्वल क्रमांकावर आहे. सोमवारी कारखान्याने ३१ डिसेंबरपर्यंतचे सर्व पैसे उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले.
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर कारखान्याचे युनिट हेड पुष्कर मिश्रा यांनी सांगितले की, चालू गळीत हंगामात ३१ डिसेंबर २०२१ अखेर खरेदी करण्यात आलेल्या सर्व ऊसापोटी २०.८८ कोटी रुपये कारखान्याने ऊस समित्यांना पाठवले आहेत. साखर कारखान्यावर यापूर्वीच्या गळीत हंगामातील कोणतीही थकबाकी नाही. चालू गळीत हंगामापूर्वी खूप आधी कारखान्याने सर्व ऊस बिले शेतकऱ्यांना दिली आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे देण्यात कारखाना जिल्ह्यात अग्रस्थानावर असल्याचे पुष्कर मिश्रा म्हणाले. उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याला पाला, माती विरहीत स्वच्छ ऊसाचा पुरवठा करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.