लखनऊ: राजस्थानच्या आजमेर जिल्हयामध्ये टोळधाडीच्या प्रादुर्भावाच्या सुचनेनंतर, ऊस आणि साखर आयुक्त संजय भूसरेड्डी यांनी ऊस संशोधन केंद्रांच्या सर्व विभागीय अधिकारी आणि वैज्ञानिकांना शेतकर्यांच्या सुरक्षेसाठी जागरुकता अभियान चालवण्याचे निर्देश जारी केले आहेत. जेणेकरुन ऊस पीकाच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षात्मक उपाय केले जावू शकतील.
भूसरेड्डी यांनी सांगितले की, टोळधाडीचा प्रादुर्भाव आता राजस्थानातील आजमेर जिल्ह्यात पोचला आहे. आणि याच्या नियंत्रणासाठी एक ठोस योजना तयार करण्याची आवश्यकता आहे. राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यामध्ये टोळधाडीला रोखण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी सातत्याने गावातील दौरा करावा आणि शेतकर्यांना जागृत करावे. कीटकांच्या संभाव्य आक्रमणाला विफल बनवण्यासाठी पुरेशी सावधानी बाळगावी. यासाठी वृत्तपत्रांमधून पॅम्पलेट, हॅन्डबील वितरीत करणे आणि कीटक विरोधक उपाय प्रकाशित करणे, सर्व कार्यालये आणि गोदामांच्या भिंतींवर कीटकाचा फैलाव थांबवण्यासाठी उपाय लिहिणे आणि सर्व शेतकर्यांना माहिती देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
त्यांनी ऊस शेतकर्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या शेतात जाताना टोळांच्या प्रादुर्भावावर करडी नरज ठेवावी. जर टोळ ऊसाच्या पीकावर दिसत असतील, तर त्यांना क्लोरपीरिफोस 20 पर्सेंट ईसी, क्लोरपीरिफोस 50 पर्सेंट ईसी, बुन्डीओमेथरीन, फिपरॉनील आणि लंबडा यांसारख्या कीटकनाशके फवारावीत. टोळाच्या फैलावाला रोखण्यासाठी तात्काळ उपाय करण्यासाठी ऊस शेतकर्यांना भारत सरकारकडून संबंधित संस्था आणि ऊस विकास विभागालाही तात्काळ सूचना दिली जावी.
ही टोळधाड (ग्रासहॉपर) एकावेळी मोठ्या संख्येने आक्रमण करतात. आणि खूप कमी वेळात पीकांचे नुकसान करते. यासाठी आक्रमणानंतर पीक वाचवणे कठीण होते. अशा परिस्थितीत आधीच तयारी करुन हे आक्रमण थांबवता येवू शकते. कमी पाणी, दुष्काळ आणि उन्हाळ्यात टोळांची गती वाढते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.