सार्वजनिक आस्थापना विभाग येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत ‘सीपीएसई ची गोलमेज परिषद आणि प्रदर्शन 2023’ करणार आयोजित

सार्वजनिक आस्थापना विभाग, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आस्थापनांच्या सहकार्याने, तसेच स्कोप (एससीओपीई ) च्या सहकार्याने नवी दिल्लीत येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी ‘सीपीएसईची गोलमेज परिषद आणि प्रदर्शन 2023’ आयोजित करणार आहे. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ, भागवत किशनराव कराड प्रमुख पाहुणे म्हणून ही गोलमेज परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

गोलमेज परिषदेदरम्यान, व्यावसायिक विवादांच्या निराकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर), सामंजस्य करार यांसारख्या मुद्द्यांवर चर्चासत्रे होणार आहेत. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी, अंमलबजावणी संस्था, संबंधित मंत्रालये आणि आकांक्षी जिल्ह्यांतील प्रतिनिधी या कार्यक्रमांना उपस्थित राहतील.

सामाजिक बांधिलकी सुधारण्यासाठी, विवादांचे निराकरण करण्यासाठी आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आस्थापनांची कामगिरी सुधारण्यासाठी भागधारकांच्या चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने ही गोलमेज आयोजित केली जाणार आहे.

गोलमेज परिषदेदरम्यान, नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे, ‘सीएसआर गाथा: सीपीएसई आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्था’ या शीर्षकाचे प्रदर्शनही भरवले जाईल. सार्वजनिक आरोग्य, पोषण, शिक्षण, क्रीडा आणि इतर क्षेत्रांना बळकट करण्यासाठी त्यांच्या सीएसआर उपक्रमांद्वारे सीपीएससी ने दिलेल्या योगदानाची माहिती, या प्रदर्शनातून दिली जाईल. हे प्रदर्शन, 25 ते 26 सप्टेंबर या कालावधीत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here