विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून उसाचा २,७०० रुपयांचा पहिला हप्ता जमा : आ. बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे पिंपळनेर व करकंब या कारखान्यांच्या युनिटद्वारे १० डिसेंबरअखेरची ऊस बिल प्रती टन २,७०० रुपये दराने जमा करण्यात आली आहेत. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले कि, गळीत हंगामामध्ये १ ते १० डिसेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या चौथ्या १० दिवसांचे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. तर ऊस तोडणी, वाहतूकीसाठी असलेल्या वाहनचालकांची ३० नोव्हेंबर अखेरपर्यंतची तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार शिंदे यांनी सांगितले की, पिंपळनेर युनिटमध्ये प्रती दिन १३००० ते १३५०० मे. टन व करकंब युनिटमध्ये प्रती दिन ४५०० ते ५००० मे. टन गाळप होत आहे. पिंपळनेरमध्ये आजअखेर ५,३७,४१३ मे. टन ऊस गाळप झाले आहे. तर सहविज प्रकल्पातून आजअखेर २,०९,७०,००० युनिट वीज विक्री करण्यात आली असून डिस्टीलरीतून १,१०,२२,६३५ लिटर अल्कोहोल व ८२,७९,७१९ लि. इथेनॉल उत्पादन झाले आहे. करकंब युनिट नं. २ मधून आजअखेर १,७५,३८४ मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सहविज प्रकल्पातून ६४,६४,००० युनिट वीज विक्री करण्यात आल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here