कोल्हापूर : कुडित्रे येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याने चालू हंगामामध्ये १६ ते ३१ डिसेंबर २०२३ अखेर गळीतास आलेल्या ८७ हजार ५१४ मे. टन उसाची रुपये ३२०० प्रमाणे होणारी २८ कोटी ४६ हजार रुपये इतकी रक्कम संबंधित ऊस पुरवठाधारकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली ही माहिती दिली.
चेअरमन नरके म्हणाले की, कारखान्याने चालू हंगामात १६ ते ३१ डिसेंबर २०२३ अखेर गळीतास आलेल्या उसास प्रती टन रुपये ३२०० प्रमाणे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. कारखान्याच्या गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी संपूर्ण ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे. यावेळी व्हा. चेअरमन विश्वास पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.