कोल्हापूर : हलकर्णी येथील दौलत-अथर्व साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगामातील ३१ जानेवारी अखेरची एकूण सुमारे १०५ कोटी रुपयांची ऊस बिले संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खराटे यांनी दिली. कारखान्याने सुरुवातीपासूनच दर पंधरवड्याला बिले देण्याची परंपरा कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी शासनाच्या धोरणांमुळे आर्थिक अडचण निर्माण झाली असली तरीही प्रशासनाने योग्य नियोजन करून बिले वेळेत दिली आहेत. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-ओढणी कंत्राटदार यांचा विश्वास संपादन केला आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज या कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने उचलून गाळप केले आहे, असेही खोराटे यांनी स्पष्ट केले.