बिजुआ-खीरी : एकीकडे जिल्ह्यातील बहुसंख्य भागात ऊस बिलासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत, तर गुलरिया साखर कारखान्याने आपल्या नव्या हंगामात २९ नोव्हेंबरअखेर खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे अदा केले आहेत.
लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, याबाबत गुलरिया साखर कारखान्याच्या वाणिज्य विभागाचे अप्पर महाप्रबंधक तुषार अग्रवाल यांनी सांगितले की गुलरिया साखर कारखान्याने नव्या गळीत हंगामात २९ नोव्हेंबरपर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटी ३९ कोटी ४८ लाख ७४हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले आहेत. यासोबतच शेतकऱ्यांनी कारखान्याला स्वच्छ ऊस पाठवावा असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे. कोविड महामारीचा फैलाव होण्याची शक्यता पाहता शेतकरी, ऊस वाहतुकदार व सर्व घटकांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन अग्रवाल यांनी यावेळी केले.