हरियाणा : जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षांपर्यंत एकमेव इंडस्ट्रिज च्या रुपात असणार्या भूना साखर कारखान्यावर प्रदेश सरकारचे दोन सर्वात मोठे स्तंभ समोरा समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी रतिया मध्ये पोचलेले सीएम मनोहर लाल यांनी बोलताना सांगितले होते की, भूना साखर कारखाण्याचा विषय बंद झाला आहे, कारण गेल्या सरकारने तो विकला होता. आता खाजगी पार्टी यावर साखर कारखाना सुरु करेल किंवा कुठली इतर प्रॉपर्टी, ती त्यांची इच्छा आहे पण सोमवारी जांडलीकला येथे पोचलेल्या डिप्टी सीएम दुष्यंत चौटाला यांनी भूना क्षेत्रातील ऊस शेतकर्यांना पुन्हा आशेचा किरण दाखवला आहे.
जांडलीकला मध्ये बोलताना जेव्हा भूना साखर कारखान्याशी संबंधीत प्रश्न डिप्टी सीएम दुष्यंत चौटाला यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, भूना साखर कारखान्याला विकण्याबाबतच्या करारामध्ये हे सांगण्यात आले होते की, खाजगी फर्म इथे साखर कारखाना चालवणार. पण त्या फर्म ने असे केले नाही. डिप्टीसीएम म्हणाले, त्यांनी याबाबत संज्ञान घेतले आहे आणि याबाबत कोर्टातही चर्चा झाली आहे. दुष्यंत म्हणाले की, ते सकारात्मक आहेत की ही जमीन सरकार पुन्हा परत घेणार आणि तिथे कुठे ना कुठेतील इंडस्ट्रिज ला डायवर्ट करेल.
यावेळी जेजेपी चे प्रदेश अध्यक्ष तसेच माजी आमदार सरदार निशान सिंह, टोहाना चे आमदार देवेंद्र सिंह बबली, सुरेंद्र लेगा, पूर्व अध्यक्ष होशियार सिंह ढिल्लो, राजेंद्र सिंह बिल्ला, युवा नेता विकास मेहता, मनोज बबली, कामरेड भूपेंद्र सिंह, जांडलीकला चे पूर्व सरपंच प्रताप सिंह, दलबीर सिंह, रामस्वरुप मंडेरणा, सुरेश कुमार भैरो, नंबरदार रमेेश कुमार, वजीर सिंह, बसाउ राम, नंबरदार मांगेराम, एसडीएम संजय बिश्नोई, तहसीलदार विजय कुमार, डीपीआरओ आत्माराम, खंड विकास तसेच पंचायत अधिकारी महेंद्र सिंह नेहरा, एसईपीओ नरेंद्र सिंह कुंडू, विजय कुमार कमांडो, गोपाला राम, खैराती लाल छोकरा, जीतसिंह जांडली, सतबीर सिंह जागलान, बिट्टू मुंजाल, नत्थू राम दहिया आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.