केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागा अंतर्गत, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई विभागाचे मुख्य आयुक्त म्हणून के.आर. उदय भास्कर यांनी पदभार स्वीकारला.
के.आर. उदय भास्कर हे 1990 च्या तुकडीचे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी असून, त्यांनी मुंबई, चेन्नई, म्हैसूर, त्रिची आणि कोची येथे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाच्या विविध क्षेत्रीय विभागांमध्ये काम केले आहे. त्यांनी कलपक्कम येथे अणुऊर्जा विभागात सीव्हीओ पदावर आणि सक्तवसुली संचालनालयात विशेष संचालक म्हणून काम केले आहे. सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई झोनचे मुख्य आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, त्यांनी तिरुचिरापल्ली येथे सीमाशुल्क प्रतिबंधक विभागाचे मुख्य आयुक्त म्हणून काम केले आहे.
(Source: PIB)