साखर उद्योग अतिरिक्त साखरेच्या साठ्यासाठी संघर्ष करीत असल्याने, साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सरकार इथेनॉल उत्पादनावर जोर देत आहे. आगामी काळात, चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी विवाद असूनही भारत आणि बाझिल इथेनॉल उत्पादनासाठी एकत्र येतील. अहवालानुसार, या दोन्ही प्रमुख साखर उत्पादक देशांनी नोव्हेंबरमध्ये ब्राझिलिया येथे इथेनॉलचे उत्पादन आणि व्यापार यावर समझोता करार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबरमध्ये ब्राझीलच्या अध्यक्ष जैयर बोल्सनारो यांची अधिकृत भेट घेतील, जेथे दोन्ही देश व्यापार संबंधांना बळ देण्याचा प्रयत्न करतील. पुढील दशकात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आणि ते साध्य करण्यासाठी, भारत ब्राझीलची मदत घेईल.
एकीकडे भारत आणि ब्राझील सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे ब्राझीलने भारतीय साखर सब्सिडी बाबत विवाद करुन जागतिक व्यापार संंघटनेला ही सबसीडी जागतिक व्यापाराच्या नियमांशी विसंगत असल्याचे सांगितले आहे .
भारतात, बऱ्याच कंपन्या इथेनॉलची निमिती करण्यासाठी स्वारस्य दर्शवित आहेत. नुकतीच, टीव्हीएस मोटर कंपनीने भारतातील पहिली इथेनॉल मोटरसायकल सुरू केली, ज्यामुळे भारतात इथेनॉलची मागणी वाढेल.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.