पॅरिस : यावर्षी पावसाची कमतरता असूनही फ्रान्समध्ये बीटचे उत्पादन गेल्या पाच वर्षाच्या सरासरीपेक्षा अधिक उत्पादन होईल, अशी अपेक्षा आम्हाला असल्याचे फ्रान्सचा सर्वात मोठा साखर उत्पादक समूह टेरियोसने (Tereos) म्हटले आहे. युरोपीयन संघातील सर्वात मोठा कृषी उत्पादक असलेल्या फ्रान्सला यंदा दुष्काळ आणि उष्णतेचा सामना करावा लागला आहे. Tereosने दिलेल्या माहितीनुसार फ्रान्समध्ये कमी पाऊस असूनही २०२२ च्या हंगामात पिकाची वाढ व्यवस्थीत झाली आहे. आणि सद्यस्थितीत गेल्या पाच वर्षांच्या सरासरीप्रमाणे यंदाच्या हंगामात चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
बीटची लागवड कमी करण्याच्या ट्रेंडमुळे Tereos ला फ्रान्समध्ये गाळप क्षमता कमी करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यास भाग पाडले आहे. यांदरम्यान प्रतिस्पर्धी असलेल्या क्रिस्टल युनियनने बीटचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी उत्पादकांना पैसे वाढवून देण्याचा विचार केला आहे. टेरियोस समुहाने सांगितले की, युरोपमध्ये साखरेच्या किमतीत दुसऱ्या तिमाहीत वाढ सुरू होती. मात्र, इथेनॉल बाजाराला अपुऱ्या पुरवठ्याचा सामना करावा लागला आहे.