पाकिस्तानात पुरामुळे विद्ध्वंस, कोट्यवधी लोकांना फटका

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. जवळपास ११०० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोट्यवधी लोकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्यात बुडाला असून शहबाज शरीफ सरकारने जगातील इतर देशांकडून मदत मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानात पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत दुःख व्यक्त केले आहे. पाकिस्तान सरकारचे क्लायमेट चेंज खात्याचे मंत्री शेरी रहमान यांनी सांगितले की, मान्सूनच्या अत्याधिक पावसाचा फटका एक तृतीयांश भागाला बसला आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दशकभरातील हा मॉन्स्टर मान्सून आहे. पाकिस्तानात ११०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १६०० जण जखमी झाले आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अॅथॉरीटीच्या आकडेवारीनुसार, आर्थिक तंगीने बेजार झालेल्या पाकिस्तानसाठी हे एक मोठे संकट बनले आहे. पाकिस्तानच्या डोंगराळ भागात हजारो लोक पुरात अडकले आहेत. त्यांना सोडवणे शक्य झालेले नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन कोटी लोकांना याचा फटका बसला आहे. पुरामुळे रस्ते, इमारती, पूल यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here