बाराबंकी : समाजवादी पक्षाचे माजी कॅबिनेट मंत्री तथा माजी प्रदेश महासचिव अरविंद कुमार सिंह यांनी हैदरगढमधील पोखरा साखर कारखान्याला भेट दिली. कारखान्याचे मुख्य महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांच्याकडून त्यांनी ऊस शेती आणि कारखाना व्यवस्थापनाबाबत माहिती घेतली. मुख्य महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांनी सांगितले की, साखर कारखान्यात ऊसाच्या नव्या प्रजातीची निर्मिती करण्यासाठी एका संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील खासगी साखर कारखान्यांमध्ये ही एकमेव लॅब आहे. शहाजहांपूरमधील उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेचे निवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. प्रताप सिंह यांच्याकडून टिश्यू कल्चरद्वारे नव्या प्रजातींच्या विकासासाठी काम केले जात आहे.
दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डॉ प्रताप सिंह यांनी सांगितले की, यावर्षी दोन लाख रोपे तयार करण्याची योजना आहे. यावर काम सुरू आहे. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन अधिक वाढेल. नव्या तंत्रज्ञानामुळे उसाच्या विकासात भर पडेल. आम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी, नेहमीच तत्पर आहोत असे डॉ. प्रताप सिंह म्हणाले. यावेळी माजी आमदार राम गोपाल रावत, नसीम कीर्ति, मुकेश शुक्ला, हशमत अली गुड्डू आणि सानू राठौर आदी उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi टिश्यू कल्चर तंत्राने उसाचे नवे वाण विकसित: वरिष्ठ संशोधकांची माहिती