सोलापूर : माळीनगर कारखान्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला असून ऊस उत्पादकांन आर्थिक स्थैर्य मिळाल्याचे मत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले. माळीनगर फेस्टिवलचे उद्घाटन खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, माळीनगर साखर कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.
यावेळी माळीनगर शुगरचे चेअरमन राजेंद्र गिरमे म्हणाले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे गेल्या लोकसभेला एक लाख मताधिक्क्याने विजयी झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदारांना दोन लाखांचे लीड देऊ, असे सांगितले. यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे, मोहन लांडे, राहुल गिरमे, विशाल जाधव, निखिल कुदळे, नीळकंठ भोंगळे, प्रकाश गिरमे, नितीन इनामके, कपिल भोंगळे, महादेव एकतपुरे, रावसाहेब सावंत-पाटील, राहुल रेडे-पाटील, अशोक चव्हाण आदी संचालक, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.