बिजनौर : धामपूर साखर कारखान्याने आतापर्यंत १९२ दिवसांच्या गळीत हंगामात दोन कोटी २१ लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले आहे. साखर कारखाना यंदा नव्या उद्दीष्टासोबत नवा विक्रम प्रस्थापित करेल, अशी शक्यता आहे. कारखान्याने यंदा अडीच कोटी क्विंटलहून अधिक उसाच्या गाळपाचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या हंगामात कारखान्याने २१२ दिवस गाळप करून दोन कोटी ३९ लाख क्विंटल उसाचे गाळप करून देशात पहिला क्रमांक पटकावला होता. धामपूर कारखान्याचे सध्या २०६ ऊस खरेदी केंद्रे सुरू आहेत. सर्व केंद्रांकडून चांगल्या पद्धतीने ऊस वजन सुरू असून उसाची कमतरता नसल्याचे सांगण्यात आले.
दैनिक अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक ओमविर सिंह यांनी सांगितले की, यंदा ३० ऑक्टोबर रोजी गाळप हंगाम सुरू करण्यात आला होता. हंगाम ३१ मे पर्यंत सुरू राहील अशी शक्यता असून २५० लाख क्विंटलहून अधिक ऊसाचे गाळप केले जाणार आहे. राज्यातील बहुतांश साखर कारखाने कार्यक्षेत्रातील ऊस समाप्त झाल्याने बंद झाले आहेत. सध्या कर्नाटकमधील ऊगार वन साखर कारखाना २३०.९४ लाख क्विंटल ऊस गाळप करून सात एप्रिल रोजी बंद झाला. कारखाना शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व ऊसाचे गाळप करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये असे आवाहन सरव्यवस्थापक ओमवीर सिंह यांनी केले. उसावरील रोगांबाबत शेतकऱ्यांना कोरोजन औषधांचा पुरवठा केला जात आहे. कार्यक्षेत्रात आतापर्यंत २२ हजार हेक्टरवर उसाची लागण झाली आहे. आणखी चार हजार हेक्टरवर लवकरच उसाची लागण होईल असे त्यांनी सांगितले.