बिजनौर : जिल्ह्यातील धामपूर साखर कारखान्याने ऊस बिले अदा करण्यात सर्वांना मागे टाकले आहे. धामपूर कारखाना आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १२० कोटी रुपयांची बिले दिली आहेत. मात्र, गेल्या वर्षी उशीराने दिलेल्या ऊस बिलांवर व्याज देण्यात कारखान्याने रस दाखवलेला नाही.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कारखान्यांमध्ये धामपूर साखर कारखान्याचा समावेश होतो. कारखान्याशी ३० हजारांहून अधिक शेतकरी जोडले गेलेले आहेत. दरवर्षी कारखाना शेतकऱ्यांकडून सर्वाधिक ऊस खरेदी करतो. गेल्यावर्षी शेतकऱ्यांकडून ७५० कोटी रुपयांहून अधिक किमतीचा ऊस खरेदी करण्यात आला होता. कारखान्याने ऊस बिले दिली. मात्र, उशीरा दिलेल्या बिलांपोटी साडेतीन कोटी रुपये व्याज देणेबाकी आहे. चालू गळीत हंगामात आतापर्यंत
कारखान्याने १९० कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. आतापर्यंत १२० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत कोणत्याही कारखान्याने इतकी रक्कम अदा केलेली नाही. मात्र चौदा दिवसांत ऊस बिले देण्याच्या नियमापासून कारखाना पिछाडीवर आहे.
ऊस विभागाचे महा व्यवस्थापक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, बँकांच्या संपामुळे काही बिले अडकली होती. सोमवारी तीन डिसेंबरपर्यंतची बिले पाठवण्यात आली आहेत. शेतकरी नेते राजेंद्र सिंह यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले थकणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.