धामपूर : धामपूर साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाची बुधवारी समाप्ती झाली. साखर कारखान्याने स्वतःचा गेल्यावर्षीचा उच्चांक तोडून पुन्हा एकदा ऊस गाळपात नवा विक्रम प्रस्थापित करत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. कारखान्याने गेल्या हंगामा २१२ दिवस गाळप करून २३९ लाख क्विंटल ऊस गाळप करून देशात पहिला क्रमांक मिळवला होता. तर यंदा २१५ दिवसांच्या गळीत हंगामात २४४ लाख क्विंटल ऊस गाळप करून दुसऱ्यांदा देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
धामपूर साखर कारखान्याचे युनिट हेड एम. आर. खान, ऊस विभागाचे सरव्यवस्थापक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याचा गळीत हंगाम बुधवारी रात्री यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. साखर कारखान्याने देशात पहिला क्रमांक पटकावल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण आहे. मुरादाबाद विभागाच्या ऊस उपायुक्तांनीही बुधवारी धामपूर साखर कारखाना प्रशासनाचे देशात पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल अभिनंदन केले आहे. युनिट हेड म्हणाले की, सर्व शेतकऱ्यांच्या सहभागाने हे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला आवाहनानुसार ताजा आणि स्वच्छ ऊस पुरवठा केला आहे. त्यामुळे या यशात शेतकरी अग्रेसर आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत साखर कारखान्याकडून १७ मेअखेरची ऊस बिले देण्यात आली आहेत. जीएसएम ग्रुपचे कार्याध्यक्ष सुभाष कुमार पांडेय, सरव्यवस्थापक विजय गुप्ता, कर्शियल हेड मुकेश कश्यप, फायनान्स हेड विकास अग्रवाल, डीएसएम ग्रुपचे चेयरमनन अशोक गोयल, व्यवस्थापकीय संचालक गौरव गोयल, अक्षत कपूर, सुनील मेहरोत्रा आदींनी या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले.