बिजनौर: साखरेच्या दरात होणारी घट, लॉकडाउनमुळे ठप्प झालेली निर्यात आणि अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेचा साठा ठेवण्यासाठी नसलेली जागा यामुळे धामपूर साखर कारखान्याने यापुढे इथेनॉलचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कारखान्याचे साखरेवरचे अवलंबत्व कमी होईल आणि इथेनॉलच्या विक्रीमुळे ऊसाचे बिलही भागवता येईल. यामुळे कारखाना शेतकर्यांनाही ऊसाचे बिल वेळेवर देवू शकेल. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे घरगुती बाजाराबरोबर जागतिक बजारातही साखरेच्या किमंतीवर मोठा दबाव आहे. या दबावाचा थेट परिणाम साखर कारखान्यांच्या बॅलेन्सशिट वर दिसून येत आहे. आणि यामुळे शेतकर्यांची बिले भागवण्यात उशिर होत आहे. आता धामपूर साखर कारखान्याने इथेनॉल उत्पादनाला उत्तेंजन देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने एक अधिसूचना काढून साखर कारखान्यांना अतिरिक्त साठ्याशी निपटण्यासाठी इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सांगितले होते. भारत सरकारच्या खाद्य व सार्वजनिक वितरण विभागाकडून 13 मे 2020 ला जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत असे सांगण्यात आले आहे की, भारतातील साखर कारखाने अतिरिक्त साठ्याचे नियोजन करु शकतात. केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इंधन ग्रेड इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त ऊस आणि साखरेला डयव्हर्ट करण्यासाठी सांगितले आहे. अतिरिक्त साखर साठा कारखान्यांसाठी डोकेदुखी बनला आहे. साखरेच्या विक्रीवर याचा परिणाम होत आहे आणि त्यामुळे किमतीत घट झाली आहे.
देशामध्ये साखरेच्या अतिरिक्त साठ्याशी निपटण्यासाठी सरकारने कारखान्यांना साखर इथेनॉलमध्ये परावर्तित करण्याची परवानगी दिली आहे. अलीकडेच केंद्र सरकारने बी हेवी मोलासेस वाल्या इथेनॉलच्या किंमती 52.43 रुपये प्रति लीटर हून वाढवून 54.27 रुपये प्रति लीटर केली आहे. तर दुसरीकडे सी हेवी मोलासेस वाल्या इथेनॉलची किंमत 43.46 रुपये प्रति लीटर पेक्षा वाढून 43.75 रुपये लीटर केली आहे. उसाचा रस, साखर, साखर सीरप यापासून थेट बनणार्या इथेनॉलचा दर 59.48 रुपये प्रति लीटर करण्यात आला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.