महाराष्ट्रातील बहुचर्चीत भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. महाडिक यांच्या पॅनलने 6755 मतांनी विजय मिळवला.
सोलापूर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या १५ जागांसाठी एकूण ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. साखर कारखान्यासाठी काल, १३ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते आणि त्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण ७८.८६ टक्के मतदारांनी मतदान केले.
सोलापूरस्थित सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कडाडी मंगल कार्यालयात आज सोमवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. धनंजय महाडिक यांच्या भीम शेतकारी विकास आघाडी पॅनल विजयी झाले आहेत. धनंजय महाडिक यांचे पुत्र विश्वराज महाडिक यांनीही या निवडणुकीत बाजी मारली आहे.
महडिक यांच्या विरोधात या निवडणुकीत राजन पाटील व प्रशांत परिचारक यांचे पॅनल होते.