धाराशिव : सिद्धिविनायक कारखान्यातर्फे दोन लाख एक हजार गूळ पोत्यांचे पूजन

धाराशिव : जिल्ह्यातील खामसवाडी (ता. कळंब) व देवकुरळी (ता. तुळजापूर) येथे उभारण्यात आलेल्या श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक हे दोन गुळ कारखान्याचे युनिट यशस्वीरित्या सुरू आहेत. या सिद्धी विनायक कारखान्याच्या २ लाख १००० व्या गुळ पावडर पोत्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. धाराशिव नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे व ब्रिजयोग टोयोटाचे संचालक अमित मोदानी यांच्या हस्ते करण्यात आले.

सिद्धिविनायक कारखान्याच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील युनिटमध्ये चालू २०२४ गळीत हंगामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत २ लाख १००० गुळ पोत्याचे उत्पादन करण्यात आले आहे. या पोत्यांचे पूजन श्री सिद्धिविनायक ॲग्रोटेकचे संस्थापक चेअरमन तथा सिद्धिविनायक मल्टिस्टेटचे संस्थापक चेअरमन दत्ताभाऊ कुलकर्णी, अॅड. नितीन भोसले, बालाजी कोरे, गणेश कामटे, राम सारडे, अभय शिंदे, जमाले आदी उपस्थित होते.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here