धाराशिव : कळंब तालुक्यातील रांजणी नॅचरल शुगरने फर्मेंटेड ऑरगॅनिक मॅन्युअर अर्थात एफओएम किंवा किण्वन प्रक्रिया केलेल्या सेंद्रिय खतांचे उत्पादन सुरू केले आहे. सद्यःस्थितीत शेणखतासारख्या सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी झालीय. परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण प्रचंड वेगाने कमी होत आहे व जमिनी क्षारपड होत आहेत. यासाठी जमिनीचा पोत कायम ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक आहे. त्यासह उसाचे प्रति एकरी उत्पादन वाढवण्याची गरज आहे. यासाठीच ‘नॅचरल’ने सेंद्रीय खत उत्पादनाचे नवे पाऊल पुढे टाकले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कौशल्य विकास उपायुक्त विद्या शितोळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘नॅचरल’चे प्रमुख बी. बी. ठोंबरे, संचालक ज्ञानेश्वर काळदाते, संचालक पांडुरंग आवाड, हर्षल ठोंबरे, जनरल मॅनेजर यु. डी. दिवेकर उपस्थित होते.
फर्मेटेड ऑरगॅनिक मॅन्युअर अर्थात एफओएम किंवा किण्वन प्रक्रिया केलेल्या सेंद्रिय खतांचे उत्पादन सुरू केले आहे. हे खत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाईल. याबाबत ‘नॅचरल’चे प्रमुख बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले की, रांजणीच्या नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज समूहात दररोज शंभर टन फर्मेटेड ऑरगॅनिक मॅन्युअर अर्थात किण्वन प्रक्रिया केलेल्या सेंद्रिय खतांचे उत्पादन होत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ते सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. उसाच्या वाढीसाठी जे जे घटक आवश्यक असतात, ते सर्व घटक यात समाविष्ट असणार आहेत. उसाची वाढ तर होणार आहेच, शिवाय जमिनीचा पोत अबाधित राहून ती कायम उत्पादनक्षम राहिल.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.