गोरखपूर : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पिपराइच रिठीया साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या कामगारांची भेट घेतली. जर कामगारांना न्याय मिळाला नाही, तर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पिपराईच रिठीया साखर कारखान्याच्या कामगारांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी आम्ही याप्रश्नी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निर्मला पासवान यांनी साखर कारखान्याच्या सरव्यवस्थापकांची भेट घेतली. जर कामगारांना स्वेच्छा निवृत्तीचे पैसे दिले गेले नाहीत तर आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना एक निवेदनही सादर केले. यावेळी धर्मराज चौहान, विभाग अध्यक्ष रंभू पासवान, शहर अध्यक्ष शेखर उपाध्याय, निर्मला गुप्ता, बी. के. मिश्रा, कृष्णा, सोनू चौहान, निर्मला गुप्ता, अनुप पांडे, किशोर तिवारी आदी उपस्थित होते.