गोकर्णनाथ खीरी : थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेने ३० जून रोजी धरणे आंदोलन सुरू केले आहे. याबाबत उप जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले आहे.
राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण वर्मा यांनी सांगितले की, गोला साखर कारखान्याने गेल्या आठ महिन्यापासून ऊसाची खरेदी केली. साखर कारखान्याने कोरोना महामारी असूनही ऊसाची बिले अद्याप दिलेली नाहीत. शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने देऊन आणि धरणे आंदोलन करुन कारखान्याने शेतकऱ्यांना फक्त तीन दिवसांची ऊस बिले दिली आहेत. जेव्हा जेव्हा आंदोलने होतात, तेव्हा कारखाने एक दिवसाचे ऊस बिल अदा करते. त्यानंतर पैसे देणे बंद केले जाते. आता सहकारी ऊस विकास समितीच्या समोर ३० जून कोजी धरणे आंदोलन सुरू केले जाईल. जर पैसे दिले नाहीत, तर हे आंदोलन बेमुदत सुरू ठेवले जाणार आहे. याबाबत उप जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेले निवेदन भगवती प्रसाद गुप्ता यांच्याकडे देण्यात आले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link