नवी दिल्ली : जवळपास १९ दिवस स्थिरावल्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा डिझेलच्या दरात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पुढील काळातही डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. डिझेलच्या पैशात २० ते २१ पैशांची वाढ नोंदविण्यात आली आहे. आता देशाच्या राजधानी दिल्लीत डिझेलचा दर ८८.६२ पैसे प्रती लिटरने वाढून ८८.८२ रुपये प्रती लिटर झाले आहे. पेट्रोलचे दर ५ सप्टेंबरच्या १०१.१९ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहेत.
उपलब्ध आकडेवारीनुसार पेट्रोलियम क्षेत्राने २०२०-२१ या काळात ३,७१,७२६ कोटी रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि २,०२,९३७ कोटी रुपये राज्य शुल्क अथवा व्हॅटचे योगदान दिले आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरावर ३२.५ टक्क्यांहून अधिक केंद्रीय शुल्क आहे. तर राज्य कर (व्हॅट) २३.०७ टक्के आहे. तर डिझेलवर केंद्रीय उत्पादन शुल्क ३५.८ टक्के असून व्हॅट १४.६ टक्के इतका आहे.
कर आणि आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीमधील वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जुलैच्या मध्यात १०१.८४ रुपये प्रती लिटर आणि ८९.८७ रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. ऑगस्टच्या मध्यापासून या किमती थोड्या कमी झाल्या आहेत. भारतात ८० टक्के कच्चे तेल आयात केले जाते.