साखर उद्योगाच्या विकासासाठी डिजिटलायझेशन अपरिहार्य : हेमंत शाह

ई-बाय शुगर तर्फे आयोजित USI कॉन्फरन्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : देशातील साखर उद्योगाच्या विकासासाठी आधुनिकीकरण आणि डिजिटलकरण अपरिहार्य असल्याचे मत ई-बाय शुगरचे संस्थापक आणि एमडी हेमंत शाह यांनी व्यक्त केले. जे.के.शुगर अ‍ॅण्ड कमोडीटीज् प्रा.लि.अंतर्गत कार्यरत ई-बाय शुगर कंपनीतर्फे आयोजित USI (Uplifting Sugar Industry) कॉन्फरन्समध्ये शाह बोलत होते.यावेळी जेके समुहाचे संस्थापक जितूभाई शाह, ई-बाय शुगरचे संस्थापक आणि सीईओ उप्पल शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.

ई-बाय शुगरचे संस्थापक आणि एमडी हेमंत शाह म्हणाले कि, ई-बाय शुगर या डिजिटल प्लॅटफार्मच्या माध्यमातून ऑनलाईन साखर विक्री टेंडर प्रक्रिया राबवून साखर उद्योगात पारदर्शकता आणण्याबरोबरच साखर उद्योगाच्या भरभराटीसाठी प्रयत्न केला जात आहे. ई-बाय शुगरमुळे देशाच्या साखर उद्योगासाठी व्यवसायवृध्दी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. साखर उद्योगातील चाळीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव जेके समुहाकडे असून त्याचा फायदा देशातील साखर उद्योगाला होत असल्याचेही हेमंत शाह यांनी सांगितले. साखर कारखानदार आणि व्यापारी यांच्यातील व्यवहारात पारदर्शकता आणण्याची महत्वाची भूमिका पार पाडण्याचे काम ई-बाय शुगर करत आहे, असेही शाह यांनी यावेळी सांगितले.

ई-बाय शुगर कंपनी द्वारा आयोजित यूएसआई (अपलिफ्टिंग शुगर इंडस्ट्री) सम्मेलन में बोलते हुए ई-बाय शुगर के संस्थापक और एमडी हेमंत शाह।
ई-बाय शुगर कंपनी द्वारा आयोजित यूएसआई (अपलिफ्टिंग शुगर इंडस्ट्री) सम्मेलन में बोलते हुए ई-बाय शुगर के संस्थापक और एमडी हेमंत शाह।

यावेळी सलमान हैदर, हेमंत कुमार यांनी साखर उद्योगाचे आधुनिकीकरण, हवामानाचा साखर उद्योगावर होणारा परिणाम याबाबतची माहिती दिली. या कॉन्फरन्सला भारती शुगरचे चेअरमन ऋषीकेश लाड, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म.गो.जोशी, सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एन.वाय.पाटील, बिद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक के.एस.चौगले, दत्त इंडियाचे जीएम शरद मोरे, सोनहिरा कारखान्याचे एमडी शरद कदम, श्रीपती शुगरचे एमडी महेश जोशी, शरद साखरचे एमडी भूपाल आवटी, कुंभीचे एमडी धीरज माने यांच्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील 50 पेक्षा जास्त साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, कार्यकारी संचालक उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here