मुबई : साखर उद्योगासमोर जेव्हा कधी संकटे उभी राहिली, तेव्हा सरकारने उपाययोजना राबवून साखर उद्योगाला तारले आहे. आता तर या उद्योगात तंत्रज्ञानाचाही वापर वाढला आहे. त्यातच सरकारतर्फेही वेगवेगळे नवीन बदल केले जातआहेत. सध्याच्या सरकारच्या निर्यात धोरणामुळे साखर उद्योग तरेल, असे प्रतिपादन राज्याचे केबिनेट मंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी केले.
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनतर्फे आयोजित दोनदिवसीय ‘एआयएसटीए शुगर कॉनक्लेव-2020’ या परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
ते म्हणाले, देशात ऊसाचे उत्पादन प्रचंड वाढूनही साखरेची मागणी कमी झाली आहे. यामुळे ऊसाची किमान विक्री किंमत देणेही शेतकऱ्याला परवडेनासे झाले आहे. लाखो टन ऊस नुसता पडून आहे. यामुळे पुढील काळ साखर
उद्योगासाठी मोठा आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साखर उद्योगाला कठीण काळ आला तरी एआयएसटीए, इस्मा, विसमा या साखर उद्योगसंबंधी
संस्थांशी तसेच सरकारसोबत चर्चा करून त्याकर तोडगा काढू असेही वळसे-पाटील म्हणाले.