पुणे : जंक्शन (ता. इंदापूर) येथील सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव मोहोळकर यांना सहकाररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंदापूर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मोहोळकर यांना सहकारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील उपस्थित होते.