भारतातील कच्च्या तेलाच्या आयातीच्या खर्चाचे विस्तृत प्रतिनिधीत्व करणाऱ्या भारतीय बास्केटमध्ये अद्याप सवलतीच्या दरातील रशियन तेलाचा समावेश करणे बाकी आहे. भारत, आपल्या कच्च्या तेलाच्या एक तृतीयांश गरजेसाठी खास करुन रशियावर अवलंबून आहे. रशियाकडून आयात केलेल्या तेलाची किंमत सध्या भारतीय बास्केटद्वारे दर्शवत जात असलेल्या किंमतीपेक्षा कमी असेल.
याबाबत इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे प्रमुख अर्थतज्ज्ञ सुनील कुमार सिन्हा म्हणाले की, याचा देशांतर्गत धोरण निर्मिती आणि ग्राहकांच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. देशांतर्गत नैसर्गिक वायूची किंमत गेल्या महिन्यातील भारतीय बास्केट क्रूड किमतीच्या १० टक्के इतकी आहे.
सरकारसाठी कच्च्या तेलाचे भारतीय बास्केट धोरणात्मक बाबींसह कर आकारणी आणि गॅसच्या किमतींसाठी महत्त्वाचा संदर्भ आहे. भारतीय रिफायनरींमध्ये प्रक्रिया केलेल्या कच्च्या तेलाची ७५.६२ : २४.३८ या प्रमाणात ग्रेडनुसार वर्गीकरण दर्शवत असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनॅलिसीस सेलने (पीपीएसी) म्हटले आहे. पीपीएसीकडून भारतीय बास्केटची किंमत ठरविम्यासाठी दुबई आणि ओमान सरासरी सोर ग्रेड आणि डेटेड ब्रेंट हे जागतिक बेंचमार्क वापरले जातात.