मंगलौर,उत्तराखंड :
लिब्बरहेडी साखर कारखान्यामध्ये ऊस शेतकरी व कारखाना व्यवस्थापना मध्ये विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कारखाना व्यवस्थापनाने शेतकर्यांना अश्वासन दिले की, पुढच्या आठवड्यात 10 एप्रिल पर्यंतची थकबाकी भागवली जाईल. तसेच शेतकर्यांना आगामी गाळप हंगामाबाबत ज्या काही शंका आहेत, त्याही दूर केल्या जातील, असे सांगितले.
शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंडल अध्यक्ष संजय चौधरी यांनी संगितले की, लिब्बरहेडी साखर कारखान्याकडून सातत्याने शेतकर्यांचे शोषण केले जात आहे. आतापर्यंत कारखान्याने पूर्ण गाळप हंगामाचे पैसे दिलेले नाहीत. आता नवे पीक तयार झाले आहे. त्याचबरोबर कारखाना परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षी कोणतीही सुविधा दिली गेली नव्हती. यार्ड आदीची व्यवस्थाही ठीक नव्हती. यावर साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, कारखान्याकडून 10 एप्रिलपर्यंतची थकबाकी पुढच्या आठवड्यापर्यंत जमा केली जाईल. यासाठी एडवाइज तयार केली जात आहे. तसेच शनिवारी कारखाना परिसरात काम सुरु केले जाईल. ओमप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे संचलन रवि कुमार यांनी केले. या बैठकीत जिल्हाध्यक्ष विजय शास्त्री, किरण पाल सिंह, बालेंद्र कुमार, धर्मेंद्र सिंह, विवेक लोहान, वीरेंद्र पाल,, ऋषिपाल आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.