बीड : छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्था अनेक वर्षांपासून ग्रामीण विकासाबरोबर समाजात विविध प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहे. त्यांच्या माध्यमातून लव्हरी येथे ऊसतोड कामगार, कुटुंबासाठी प्रकल्प ओळख कार्यक्रम घेण्यात आला. ऊस तोडणी कामगारांची नोंदणी करणे व कामगार समिती स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली.
सरपंच पंडितराव चाळक, एच. पी. देशमुख, संतोष रेपे, ऊसतोड कामगार कुटुंबातील सदस्य, अंगणवाडी ताई, पुरुष बचत गट, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य, पाणलोट विकास समिती सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी पोषण आहार व आरोग्य समिती, ग्राम बाल संरक्षण समिती आदींबाबत माहिती देण्यात आली. समित्यांचे सदस्य, त्यांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या यांची माहिती देण्यात आली. प्रकाश काळे, सुनीता विभूते, निवेदिता बालमारे, राज करे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.