साखर निर्यातीबाबत (Sugar export) एक महत्वाची घडामोड सुरू आहे. सरकार साखर निर्यातीबाबत विचार करीत आहे.
याबाबत झी बिझनेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सद्यस्थितीत साखर निर्यातीबाबत दिलासा देण्याचा विचार सुरू आहे. जर याला मंजुरी मिळाली तर कालबद्ध पद्धतीने कोटा जारी केला जाईल. या आठवड्यात सचिवांच्या समितीचीही बैठक होणार आहे. त्यामध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या साखर निर्यात बंदीबाबत (Sugar export ban) दिलासा देण्याचा विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशातील साखर उद्योगाशी संलग्न संघटनांनी सरकारला साखर निर्यातीची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
ISMA नेसुद्धा साखर निर्यातीला परवानगी देण्याची मागणी केली होती. देशात सध्या साखरेचा पुरेसा साठा आहे. आणि हा साठा देशांतर्गत खप, निर्यात आणि इथेनॉल मिश्रण कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी पुरेसा असेल.
सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय साखरेच्या किमती चांगल्या स्तरावर आहे. आणि जर निर्यातीची परवानगी निळाली तर निर्यातदारांना लाभ मिळेल.