इथेनॉल उत्पादक बीसीएल इंडस्ट्रीजची डिस्टिलरीची क्षमता ७०० केएलपीडीवरून ११०० केएलपीडीपर्यंत वाढणार

बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड (बीसीएल) ही ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत स्थापनेच्या ५० व्या वर्षात पदार्पण करेल. बीसीएल ही भारतातील धान्य-आधारित इथेनॉल उत्पादकांपैकी एक कंपनी आहे. देशाच्या इंधन गरजांसाठी आयात अवलंबित्व कमी करून भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देते. कंपनीच्या भागधारकांना आणि कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या संदेशात, बीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजिंदर मित्तल यांनी म्हटले आहे की, बीसीएलची कहाणी अनेक महत्त्वाच्या टप्प्यांनी भरलेली आहे. प्रवासाच्या या टप्प्यावर पोहोचणे हे निःसंशयपणे उल्लेखनीय यश आहे. यातून केवळ दीर्घायुष्यच नाही तर बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची आणि भरभराटीची क्षमतादेखील दिसते.

मित्तल म्हणाले की, गेल्या ५० वर्षांत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. यामध्ये बीसीएलच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीचा समावेश आहे. ते त्याच्या मूळ स्वरुपापासून खूप दूर गेले आहे. ही एक प्रक्रिया आहे की, जी अजूनही चालू आहे, कारण आम्ही आमच्या नव्या अभियांत्रिकी प्रक्रियेचा पाठपुरावा करत आहोत. स्थानिक पंजाबी कंपनीपासून बीसीएलचे भारतातील एका प्रसिद्ध इथेनॉल उत्पादकात रूपांतर होण्यापर्यंतचा हा टप्पा आहे. गेल्या पाच दशकांमध्ये, बीसीएल ही एक मान्यताप्राप्त हरित ऊर्जा कंपनी बनली आहे. डिस्टिलरी विभागातील नवीन श्रेणींमध्ये नवीन ग्राहकांना सेवा देण्यासाठी इथेनॉल उत्पादन क्षेत्रात आम्ही निर्माण केलेली विश्वासार्हता वाढवली आहे. डिस्टिलरी उद्योगासाठी उत्पादन उत्कृष्टता उपायांमध्ये BCL आघाडीवर राहील याची खात्री वाटते.

राजिंदर मित्तल म्हणाले की, तंत्रज्ञानाने व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीत प्रगती केली असली तरी, आम्हाला अजूनही असे वाटते की प्रत्यक्ष भेट देणे, आमच्या ग्राहकांच्या कामकाजात सहभागी होणे हा कायमस्वरूपी भागीदारी निर्माण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कंपनीने इथेनॉल क्षेत्रात केलेल्या प्रगतीबाबत बोलताना ते म्हणाले की, ५० व्या वर्षात, बीसीएल भटिंडा डिस्टिलरी येथे त्यांची डिस्टिलरी क्षमता ४०० केएलपीडी वरून ५५० केएलपीडीपर्यंत वाढवून मोठी झेप घेण्यास कंपनी सज्ज आहे. हरियाणा राज्यात आमच्या अलीकडेच अधिग्रहित केलेल्या प्लांटच्या ठिकाणी २५० केएलपीडी धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट उभारण्याबाबतही आम्ही चांगली प्रगती करत आहोत. परिणामी, बीसीएलची एकूण डिस्टिलरी क्षमता नजीकच्या भविष्यात सध्याच्या ७०० केएलपीडीवरून ११०० केएलपीडीपर्यंत वाढेल. क्षमता वाढीमुळे भारतातील धान्य-आधारित इथेनॉल उत्पादन क्षेत्रातील अग्रणी म्हणून बीसीएलचे स्थान लक्षणीयरीत्या मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, पश्चिम बंगालमधील खरगपूर येथील कंपनीची डिस्टिलरी क्षमता ३०० केएलपीडी आहे. हरित ऊर्जा उपक्रमांना चालना देण्यासाठी बीसीएलची वचनबद्धता बळकट करण्यासाठी, भटिंडा डिस्टिलरी येथे ७५ केएलपीडी बायो-डिझेल प्लांटचे काम जोरात सुरू आहे आणि खरगपूर डिस्टिलरीलाही ७५ केएलपीडी बायो-डिझेल प्लांट स्थापन करण्यास संमती मिळाली आहे. १९७६ मध्ये स्वर्गीय द्वारकादास मित्तल यांनी एका लहान खाद्यतेल उत्पादन कारखान्याच्या रूपात सुरू केलेली ही कंपनी नंतर उत्तर भारतात घरोघरी लोकप्रिय झाली, कारण तिच्या अनेक ब्रँडच्या खाद्यतेल आणि वनस्पति तूप जवळजवळ प्रत्येक घरात वापरले जात होते.

कंपनीने २००५ मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला आणि भटिंडा शहरात काही सर्वोत्तम प्रकल्प विकसित केले आहेत, जे अजूनही शहरातील बेंचमार्क मानले जातात. २०१० मध्ये, कंपनीने डिस्टिलरी व्यवसायात पाऊल ठेवले आणि २०११ मध्ये पहिले धान्य-आधारित ENA उत्पादन युनिट स्थापन करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून कंपनीने कधीही मागे वळून पाहिले नाही. कंपनी ईएनए – इथेनॉल उत्पादन व्यवसायात सतत वाढ करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here