बेळगाव : सतीश शुगर्स कारखान्याच्या सीएसआर निधीतून मुडलगी शैक्षणिक विभागातील २० प्राथमिक व माध्यमिक शाळांना ४०० डेस्क आणि २० ग्रीन बोर्डचे वितरण नुकतेच करण्यात आले. अध्यक्ष प्रदीपकुमार इंडी यांनी गटशिक्षणाधिकारी अजित मण्णीकेरी यांच्याकडे साहित्य सुपूर्द केले. यावेळी अध्यक्ष इंडी म्हणाले, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक काम सुरु आहे. नायक स्टुडंट फेडरेशन शिक्षण संस्थेतर्फे १६ प्राथमिक व माध्यमिक शाळांना, सतीश शुगर्सतर्फे पदवीपूर्व व पदवी महाविद्यालयांना मदत केली आहे, असे त्यांनी सांगितले.
कारखान्याकडून ग्रामीण भागातील शेतकरी, युवक, मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गटशिक्षणाधिकारी मण्णीकेरी यांनी या कार्याचे कौतुक करुन आभार मानले. त्यानंतर डेस्क व ग्रीन बोर्ड तयार करणारे मौनेश कंबार, चंद्रकांत सुतार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पी. डी. हिरेमठ, वीरु तळवार, दिलीप पवार, व्यवस्थापक गिरीश सोनवालकर, सदाशिव मालगार, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.