१५ नोव्हेंबर पासून कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रेलर, ट्रक यांचा वापर करण्यात येतो. रात्रीच्या अंधारामध्ये वाहतुकीदरम्यान इतर वाहन चालकांना ट्रेलरचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याकारणाने असे अपघात होऊ नये त्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा सप्ताह नॅचरल शुगरच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड रांजणी कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक बी बी ठोंबरे यांच्या हस्ते साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर टायर बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रेलर या वाहनांना रेडिअम रिफ्लेक्टर फलकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमामध्ये उपस्थित वाहन चालकांना नशापाणी न करता वाहन चालवणे, रस्ते अपघात रोखण्याच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी बाबत चेअरमन बी बी ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जनरल मॅनेजर उद्धव दिवेकर, केन मॅनेजर मदन सूर्यवंशी, ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर, ऊस पुरवठा अधिकारी अरुण वाघमारे, सुरक्षा अधिकारी भारत भोरे, केन यार्ड सुपरवायझर सुनील गायकवाड तसेच ट्रॅक्टर चालक उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi नॅचरल शुगर कडून रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने रेडिअम रिफ्लेक्टर फलकाचे वाटप
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 18/04/2025
ChiniMandi, Mumbai: 18th April 2025
Domestic Market
Domestic sugar prices remained stable
Prices for sugar in the major domestic markets were reported to be stable for the...
भारत के महाशक्ति समूह और मध्य अफ्रीकी गणराज्य के बीच चीनी और कसावा परियोजना...
नई दिल्ली : राष्ट्रपति तौदर के नेतृत्व में मध्य अफ्रीकी गणराज्य (CAR) की सरकार ने कसावा और गन्ना फसलों के विकास पर भारतीय महाशक्ति...
राजस्थान में भीषण गर्मी: चूरू में तापमान 44.2 डिग्री सेल्सियस तक पहुंचा
चूरू : राजस्थान के चूरू में भीषण गर्मी की स्थिति है, जहां तापमान 40 डिग्री सेल्सियस को पार कर गया है। भारतीय मौसम विभाग...
लखीमपुर खीरी: गन्ने की फसल पर पायरिला कीट का हमला
लखीमपुर खीरी, उत्तर प्रदेश : अमर उजाला में प्रकाशित खबर के मुताबिक, जनपद में गन्ने की फसल में पायरिला नामक कीट का हमला देखने...
Kenya Sugar Board in final stages of leasing state-owned sugar factories to boost efficiency
The Kenyan government, through the Kenya Sugar Board (KSB), is in the final stages of a significant initiative to lease several state-owned sugar factories....
‘भीमाशंकर’चा साखर उतारा १२ टक्के : साडेबारा लाख साखर पोती उत्पादन, हंगामाची सांगता
पुणे : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ मधील गाळप हंगामात ११ लाख ३८ हजार ४९६ टन ऊस गाळप केले. सरासरी...
हिंगोली: थकीत ऊस बिलांसाठी साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा
हिंगोली : दोन महिन्यांनंतरही उसाचे पैसे मिळाले नसल्याने कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांत पैसे मिळाले नाही...